सुनील मोरे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:31+5:302021-09-12T04:44:31+5:30
वाई : सुरूर येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मोरे यांना सेवानिवृत्ती गुणगौरव समारंभातून निरोप ...

सुनील मोरे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
वाई : सुरूर येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मोरे यांना सेवानिवृत्ती गुणगौरव समारंभातून निरोप देण्यात आला. अरविंद देशमुख यांच्याहस्ते मानपत्र देऊन सुनील मोरे यांचा गौरव केला.
यावेळी वाई तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष शालिवान नलावडे, संस्थाअध्यक्ष प्रताप यादव, अरविंद देशमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. अरविंद चव्हाण होते. प्रताप यादव, उपमुख्याध्यापक संपत कांबळे, प्रताप यादव, सतीश शेंडे, माधवराव डेरे, आबा डेरे, आनंद पटवर्धन, संजय कुंभार, स्नेहल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष श्रीकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक भारत खामकर, सतीश वैराट, संदीप पोळ, धनजय डेरे, सी. बी. साळुंखे, विठ्ठल माने, चित्रा मोरे उपस्थित होते. मुख्याध्यापिका जबीन शेख यांनी प्रास्ताविक केले. राजेश भोज यांनी सूत्रसंचालन केले. दादा बनसोडे यांनी आभार मानले. (वा. प्र.)
११वाई-सुनील मोरे
सुरुर येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मोरे यांना अरविंद देशमुख यांच्याहस्ते सेवानिवृत्ती गुणगौरव समारंभातून निरोप देण्यात आला.