जवानांच्या कुटुंबांचा सन्मान गरजेचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:38+5:302021-08-18T04:45:38+5:30
पाल, ता.कऱ्हाड येथे शहीद वीर जवान राजेंद्र सुरेश जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात ...

जवानांच्या कुटुंबांचा सन्मान गरजेचा!
पाल, ता.कऱ्हाड येथे शहीद वीर जवान राजेंद्र सुरेश जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी सैनिक दिनकरराव खंडाईत होते. मदनभाऊ काळभोर, सुरेश लगदिवे, राजेंद्र कदम, सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, सूर्यकांत पडवळ, सुभेदार कुंडलिक पवार, सुरेश जाधव, दिलीप वाघ, संजय म्हसवर, विश्वासराव काळभोर, विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मदन काळभोर म्हणाले, ‘सैनिकांमुळे आपण सर्व जण सुखी आहोत. सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर गावांमध्ये चांगले काम करत असतात. नुकताच गावामध्ये महापूर आला होता. त्यावेळी गावातील आजी, माजी सैनिकांनी परिश्रम घेऊन गावातील अनेकांचे प्राण वाचविले. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. गावातील युवकांसाठी गावांमध्येच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उभारावे. ज्यामुळे अनेक युवक सैन्यामध्ये भरती होतील.’
यावेळी सुरेश लगदिवे, राजेंद्र कदम, दिनकर खंडाईत यांनी मनोगत व्यक्त केले. शहीद वीर जवान राजेंद्र सुरेश जाधव यांना पाल ग्रामपंचायत, योगेश्वर जनसेवा सामाजिक संस्था, काकासाहेब काळभोर प्रतिष्ठान, सुरेश पाटील युवा मंच व विविध संस्थांनी अभिवादन केले. प्रास्ताविक शंकरराव शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.गणेश इंजेकर यांनी केले. आभार सुनील काळभोर यांनी मानले.
फोटो : १७केआरडी०२
कॅप्शन : पाल, ता. कऱ्हाड येथे आजी-माजी सैनिकांचा सत्कार दिनकरराव खंडाईत, सुरेश पाटील, मदन काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला.