चाऱ्याची आणीबाणी...

By Admin | Updated: March 13, 2016 00:58 IST2016-03-13T00:58:02+5:302016-03-13T00:58:23+5:30

काही दिवस पुरेल एवढाच चारा : साडेसात लाख जनावरे; पाण्याची गरज अडीच कोटी लिटरची

False Emergency ... | चाऱ्याची आणीबाणी...

चाऱ्याची आणीबाणी...

सागर गुजर - सातारा
पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्याकडील पशुधन वाचविण्याची धावपळ शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. पाणी घटत चालल्याने दिवसेंदिवस जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उभा राहिला आहे. जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत काही दिवस पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे प्रशासनाकडील आकडेवारीवरून समोर येते. हा चारा पुरवून वापरण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही गरज वाढली आहे. विहिरींची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली असून, बोअरवेलचे पाणीही जागोजागी आटले आहे. मे महिन्यापर्यंत चारा पुरु शकतो; परंतु त्यानंतरही पावसाने आणखी ओढ दिल्यास भीषण पाणी व चारा टंचाई होऊ शकते.
जिल्ह्यामध्ये ७ लाख ३० हजार १०६ जनावरांना रोज ९९ लाख ४७ हजार ३२ किलो इतका ओला चारा लागत आहे. तसेच ३९ लाख ७८ हजार ८१३ किलो इतका सुका चारा लागत आहे. प्रशासनाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात चारा उपलब्ध असल्याचे दिसत असले तरी आकडेवारीवरून हे ठोकताळे काढणे धाडसाचे ठरणार आहे.

Web Title: False Emergency ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.