फडणविसांचं नव्हे फसवणुकीचं सरकार!
By Admin | Updated: October 19, 2015 23:43 IST2015-10-19T22:54:11+5:302015-10-19T23:43:34+5:30
धनंजय मुंडे : खोटे स्वप्न दाखवून भाजप सत्तेवर

फडणविसांचं नव्हे फसवणुकीचं सरकार!
सातारा : भाजपच्या नेत्यांनी खोटे स्वप्न दाखवून राज्यातील सत्ता काबीज केली आहे. एक वर्ष पूर्ण होऊनही भाजप जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले नाही. त्यामुळे फडणविसांचं नव्हे, तर फसवणुकीचं सरकार, असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
विश्रामगृहावर आलेल्या मुंडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाजप सरकारने ७० टक्के शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. सबंध राज्य टोलमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. सरकारने विश्वासघात केला असल्याने सहा लाख शेतकऱ्यांनी अटक करून घेतली. दरम्यान, २५ तारखेपासून राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधात आंदोलन सुरू केले जाणार आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रवादीतर्फे प्रत्येक महसूल कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. सरकारचे अपयश गावागावांमध्ये पोहोचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)