शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील कारखाने ऊसाच्या गाळपात पुढे; दर देण्यात मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 19:20 IST

साखर उताराही चांगला; जिल्ह्यातील तीन कारखाने टॉप टेनमध्ये

ठळक मुद्देसाखर उताराही चांगलाजिल्ह्यातील तीन कारखाने टॉप टेनमध्ये

सातारा : ऊस गाळपामध्ये राज्यातील कारखान्यांच्या यादीत दहावा क्रमांक पटकावलेल्या सातारा जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांना दर देण्यात मात्र मागच्या पायावर आहेत. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी १४४ दिवस गाळप हंगाम करून ९९ लाख ८ हजार २१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले, त्यातून १ कोटी ११ लाख ६३ हजार ४२० क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ११.२७ टक्के इतका राहिला आहे.जरंडेश्वर कारखान्याने जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त १४ लाख ३८ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले त्यातून १६ लाख ५६ हजार १५० क्विंटल साखर निर्मिती केली. कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यामध्ये पहिल्या दहा कारखान्यांच्या यादीत सहावा क्रमांक मिळवला असून तब्बल १२.६७ टक्के साखर उतारा मिळवला आहे.शेतकऱ्यांना दर देण्याच्या बाबतीत कारखान्यांनी आखडता हात घेतल्याचे पाहायला मिळते. साखर निर्मिती आणि उताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कारखाने सर्वात पुढे असले तरी शेतकऱ्यांना ऊसाचा दर देण्यामध्ये मागे पडले. राज्यातील ज्या दहा कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगला दर दिला त्या १० कारखान्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांपैकी एकाही कारखान्याचे नाव नाही. कोरोनाचे संकट असतानादेखील साताऱ्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत.

जिल्ह्यातील सह्याद्री, कृष्णा, जरंडेश्वर हे कारखाने गाळपमध्ये पुढे असले तरी कुठल्याही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी दिलेली नाही. किसनवीर कारखान्याने तर अनेक वर्षांपासून एफ आर पी थकवलेली आहे. तीन वर्षे सतत या कारखान्याला साखर आयुक्तांमार्फत नोटीस बजावली जाते; परंतु कुठल्याही प्रकारची वसुली होत नाही.राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र