कऱ्हाडच्या प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST2021-09-13T04:37:34+5:302021-09-13T04:37:34+5:30

कऱ्हाड : राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यामार्फत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रथम कॅप राऊंडची प्रक्रिया सुरू आहे. तंत्रशिक्षण ...

Facility to fill option form in Premlatai Chavan Polytechnic of Karhad | कऱ्हाडच्या प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा

कऱ्हाडच्या प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा

कऱ्हाड : राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यामार्फत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रथम कॅप राऊंडची प्रक्रिया सुरू आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक कऱ्हाडला एफसी सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यात गेल्या ३५ वर्षांपासून वेगवेगळ्या तांत्रिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्याची परंपरा यशवंत विद्यापीठ कऱ्हाड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निकने जोपासलेली आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेळापत्रकानुसार मुदत १३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर रोजी सायकांळी पाचपर्यंत आहे. पॉलिटेक्निकमध्ये प्रथम कॅप राउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया कक्षाची सोय केली आहे. कॅप राउंडमधील प्रवेश प्रक्रियेसाठी पॉलिटेक्निकचा कोड ६४७५ असा आहे. तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर व मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्सेस सुरू आहेत, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक सेक्रेटरी बी. टी. किणीकर, प्राचार्य स्वागत यांनी केले आहे. (वा.प्र.)

Web Title: Facility to fill option form in Premlatai Chavan Polytechnic of Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.