यामध्ये ऐतिहासिक सातारानगरीला शोभेल असे शौर्याची, पराक्रमाची आठवण करुन देणारे किल्ले, येथील निसर्ग धबधबे, मंदिरे, नदी, घाट यांची छायाचित्रे, घडामोडी टाकल्या जातात. त्यामुळे अनेकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. तसेच परदेशात असलेल्यांना तेथे बसून सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती मिळत असल्याने आपल्या माणसांतच आहोत, याचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
वैद्यकीय सेवा बजावत असतानाच समाजमाध्यमांवर सक्रिय राहणे अवघड जाते. त्यामुळे डॉ. वडते यांनी आणखी तिघांना ॲडमीन बनवले आहे. ते मुंबई, पुण्यातून नियंत्रण करतात. सदस्यांनी टाकलेल्या पोस्टची खात्री करुन ती सर्वांना पाहण्यासाठी सोडली जाते.
चौकट
नाविन्यपणा आणण्याचा प्रयत्न
इतरांनी टाकलेल्या पोस्टच दाखविण्यात स्वारस्य न दाखवता नाविन्यपणा आणण्याचा प्रयत्न केला. या सदस्यांमधीलच पण वेगळेपण जपलेल्या मंडळींकडे त्यांच्या आवडीनुसार जबाबदारी दिली आहे. यामध्ये पूनम पाटील या ‘पाककला’, आरजे सोनल ह्या ऐतिहासिक सातारा, साताऱ्याचे महत्त्व याविषयी माहिती देतात. धनश्री जगताप, राजश्री जगताप आणि डॉ. अजय वडते हे साताऱ्यातील हॉटेलमधील विशेषत: थेट प्रेक्षपणाद्वारे दाखवत असतात. त्यामुळे नव्या पिढीला सातारा जवळून अनुभवता येतो.
सर्वसामान्यांना व्यासपीठ
अनेक गृहिणी, तरुण कथा, कविता करत असतात. कोण छान चित्रे काढतात. त्यांना नेहमीच प्रसिद्धी मिळतेच, असे नाही. कविता, छोट्या कथांनाही याठिकाणी प्रसिद्धी मिळत आहे.
फोटो
२६ फेसबुक सातारा.