कोरेगावमध्ये नेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:24+5:302021-02-06T05:16:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : आमदार महेश शिंदे विचार मंच व दरबार उद्योगसमूहाच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Eye in Koregaon | कोरेगावमध्ये नेत्र

कोरेगावमध्ये नेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : आमदार महेश शिंदे विचार मंच व दरबार उद्योगसमूहाच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोफत नेत्र तपासणी शिबिरात आठशेच्यावर रुग्णांनी प्रतिसाद देत तपासणी केली. त्यातील ५० रुग्णांवर मोतिबिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल विभाग व फलटण येथील सोनहिरा ट्रस्टच्या टीमने या शिबिरातील रुग्णांची तपासणी केली.

शिबिराचा प्रारंभ सुनील खत्री, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उदयसिंह बर्गे, जयवंत पवार, राहुल बर्गे, चंद्रशेखर बर्गे, युवा नेते विजयसिंह शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र बर्गे, अजय बर्गे, राजेश बर्गे, प्रशांत संकपाळ, महादेव घोरपडे, संतोष नलावडे, मिलिंद बर्गे, विनोद काटे, अजित पवार, रशीद शेख, महालिंग जंगम, प्रभाकर महाजन आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

Web Title: Eye in Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.