'आय स्पेशालिस्ट डॉक्टर'वर लाचलुचपत खात्याचा 'तिसरा डोळा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 14:10 IST2017-08-24T14:10:05+5:302017-08-24T14:10:05+5:30
सातारा : नेत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून वीस हजार रूपयांची लाच घेताना येथील जिल्हा रूग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी विजय विठ्ठल निकम लाच लुचपतच्या जाळ्यात सापडला.

'आय स्पेशालिस्ट डॉक्टर'वर लाचलुचपत खात्याचा 'तिसरा डोळा'
सातारा : नेत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून वीस हजार रूपयांची लाच घेताना येथील जिल्हा रूग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी विजय विठ्ठल निकम लाच लुचपतच्या जाळ्यात सापडला.
येथील जिल्हा रूग्णालयाच्या शासकीय वसाहतीत राहत असलेल्या निकम यांनी १५ आॅग्स्ट रोजी तक्रारदाराकडे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वीस हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने जिल्हा रूग्णालयाच्या आवारात ही रक्कम निकम याने स्विकारली. स्विकारलेल्या रकमेसह लाचलुचपतच्या कर्मचाºयांनी त्याला पकडले. या कारवाईत पोलिस उपधिक्षक सुहास नाडगौडा पोलिस निरिक्षक आरीफा मुल्ला आदी सहभागी झाले होते.