शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात पसरली हिमकणांची चादर; वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पाच अंशांखाली पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 15:44 IST

दोन-तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्खळीत

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील तापमान शनिवारी पाच अंश इतके खाली गेले होते. यामुळे या भागामध्ये अनेक ठिकाणी हिमकणांचा सडा पडल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळले. 

वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांचे छत, स्ट्रॉबेरीच्या शेतात फुलांवर तसेच येथील स्मृतिवन परिसरात हिमकणांचा सडा पाहावयास मिळाला.देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला काही दिवसांपासून हुडहुडी भरली आहे. दोन-तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्खळीत झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. 

महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. या थंडीने शनिवारी पहाटे वेण्णालेक, नौकाविहाराच्या लोखंडी जेटी, परिसरातील फुलझाडे, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील उभ्या असलेले वाहनांचे टप, झाडाझुडपांसह पानांवर अनेक ठिकाणी हिमकण जमा झाले होते. लिंगमळा परिसरातील स्मृतिवनात तर दिसेल तेथे लांबच लांब हिमकणांचा गालिचा अंथरल्याचे दिसत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान