उदंड जाहल्या शिकवण्या !
By Admin | Updated: June 25, 2014 00:30 IST2014-06-25T00:26:06+5:302014-06-25T00:30:37+5:30
पालकांची मानसिकता : मुलांच्या अभ्यासासाठी नाही वेळ

उदंड जाहल्या शिकवण्या !
नांदेड : पावसाळ्याच्या काळात साथरोगांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी दिले आहेत़
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे़ याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे़ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ २०१४ मध्ये सर्वसाधारण बदल्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होवूनही ते कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी चालू करण्यात येत आहे़
त्याचवेळी जिल्हा मुख्यालयी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय आणि तातडीच्या कामाशिवाय येवू नये असेही आदेश निर्गमित केले आहेत़ जे अधिकारी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालयी येतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी दिला़ (प्रतिनिधी)
२१ वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर
जिल्ह्यात आरोग्य विभागात १४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची १५ पदे रिक्त आहेत़ तर १६ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे आहेत़ त्यातही ४ पदे रिक्त आहेत़ जिल्ह्यात असलेल्या १२५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी २१ वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत़ प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत़ प्रत्यक्षात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे राजकीय पाठबळावर काम करीत आहेत़ त्यामुळे हे अधिकारी मूळ पदावर जातील काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़