शिष्यवृत्ती अर्जांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:06+5:302021-06-16T04:50:06+5:30

सातारा : सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ...

Extension till June 30 for scholarship applications | शिष्यवृत्ती अर्जांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्जांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

सातारा : सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीवर शिष्यवृत्ती शिक्षण फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांना २०२०/२१ शैक्षणिक वर्षातील आपल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सातारा समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.

सन २०२०/२१ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ही शेवटची अंतिम संधी देण्यात आलेली आहे. यापुढे मुदत देण्यात येणार नसून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी विहित मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी व ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये महाविद्यालयस्तरावरून सेंट बॅक टू ॲप्लिकंटमध्ये अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्रुटी पूर्ण कराव्यात, महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्याबाबत आवाहनही केले होते; परंतु अद्यापही महाविद्यालयांनी याबाबत कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांनी यात लक्ष घालावे. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, विद्यावेतन, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांची राहील. जास्तीत जास्त मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्यात यावेत, असे आवाहनही उबाळे यांनी केले आहे.

Web Title: Extension till June 30 for scholarship applications