ट्रेलर पासिंगला मुदतवाढ द्यावी
By Admin | Updated: December 2, 2015 00:39 IST2015-12-01T22:18:11+5:302015-12-02T00:39:32+5:30
परिवहन मंत्र्यांकडे मागणी : ट्रेलर उद्योजक आणि ‘आयमा’चे निवेदन

ट्रेलर पासिंगला मुदतवाढ द्यावी
शिरोली : ट्रेलरचे पासिंग ३१ डिसेंबर २0१५ रोजी संपणार आहे. ट्रॅक्टर कंपन्यांनी अद्याप ब्रेक पॉर्इंट काढलेला नाही, तरी ट्रेलर पासिंगला मुदतवाढ देण्यात यावी, याबाबतचे निवेदन मुंबईत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना ट्रेलर उद्योजक आणि अॅॅग्रीकल्चरल इम्प्लीमेंट्स असोसिएशन (आयमा) यांच्या वतीने देण्यात आले.
ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवण्यात यावी म्हणून ट्रेलरचे पासिंग बंद केले आहे, आम्ही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवायला तयार आहोत, पण ट्रॅक्टर कंपन्यांनी अद्याप ब्रेक पॉर्इंट काढून दिलेला नाही, ब्रेक पॉर्इंट काढून दिल्याशिवाय आम्ही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा लावू शकत नाही, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रॅक्टर कंपन्यांचे अधिकारी, ट्रेलर असोसिएशन उद्योजक, परिवहन सचिव संजय बंडोपाध्याय यांची दिल्लीमध्ये बैठक घेऊन ट्रॅक्टर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ब्रेक पॉर्इंट काढा असे आदेश दिले होते आणि तोपर्यंत ट्रेलर पासिंगला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पण अद्याप कोणत्याही ट्रॅक्टर कंपनीने ब्रेक पॉर्इंट काढलेला नाही, ट्रेलरचे पासिंग ३१ डिसेंबर रोजी बंद होणार आहे, तरी ट्रेलर पासिंगला मुदत वाढवून द्यावी, याबाबतचे निवेदन मुंबईत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिले.
यावेळी ‘आयमा’चे अध्यक्ष कृष्णात पाटील, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, दत्तात्रय हजारे, व्यंकटराव मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)