कामगारांसाठी कारखान्याचे विस्तारीकरण
By Admin | Updated: October 12, 2014 00:44 IST2014-10-12T00:44:22+5:302014-10-12T00:44:22+5:30
प्रल्हादराव साळुंखे-पाटील : न्यू फलटण शुगरच्या गळीत हंगामास प्रारंभ

कामगारांसाठी कारखान्याचे विस्तारीकरण
साखरवाडी : ‘न्यू फलटण शुगरची गाळप क्षमता कमी असल्याने शेतकरी व कामगारांना योग्य न्याय देणे शक्य नव्हते. विस्तारीकरणाशिवाय पर्याय नव्हता म्हणून कारखान्याचे विस्तारीकरण केले. हा हंगाम साडेतीन ते चार हजार मेट्रिक टन क्षमतेने चालणार आहे,’ असे प्रतिपादन न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी केले.
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सचा गळीत हंगामास उद्योगपती माधवराव आपटे यांच्या हस्ते मोळी व गव्हाण पूजनाने प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. शामराव भोसले, महेश साळुंखे-पाटील, वामनराव आपटे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाऊसाहेब डिसले, नानासाहेब पवार, हिरालाल पवार, किसनराव भोसले, बाळासाहेब भोसले, माणिक भोसले उपस्थित होते.
साळुंखे-पाटील म्हणाले, ‘राज्याच्या मंत्री समितीने साखर कारखाने १ आॅक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या. लगेच दिवाळी असल्याने तोडणी मजूर लगेच येणे शक्य नसले तरी लगेच हंगाम सुरू होण्याच्यादृष्टीने नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)