सद्गुरू नियतकालिकाचे प्रकाशन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST2021-07-07T04:47:50+5:302021-07-07T04:47:50+5:30

कऱ्हाड : येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील सद्गुरू नियतकालिका २०२०-२१ या अंकाचे प्रकाशन झाले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उपप्राचार्य ...

Excitement of Sadguru Magazine | सद्गुरू नियतकालिकाचे प्रकाशन उत्साहात

सद्गुरू नियतकालिकाचे प्रकाशन उत्साहात

कऱ्हाड : येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील सद्गुरू नियतकालिका २०२०-२१ या अंकाचे प्रकाशन झाले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उपप्राचार्य पाटील, नेताजी सूर्यवंशी, माधुरी कांबळे, प्रा. आर. वाय. पाटील, विवेक भोज उपस्थित होते. हिंदी विभागप्रमुख प्रा. दिलीपकुमार कसबे यांनी प्रास्ताविक केले. हनुमंत मांडके यांनी आभार मानले. रेश्मा दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मालखेड येथील गणेश लोकरे यांची निवड

कऱ्हाड : क्षत्रिय मराठा महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी मालखेड (ता. कऱ्हाड) येथील गणेश लोकरे यांची निवड झाली. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी ही निवड केली. रमण पाटील, राहुल मोरे, स्वानंद पंडित, विजय पवार, प्रकाश साबळे, रविकिरण पाटील, अनिकेत मोळावडे, दत्तात्रय निकनके, उदय पाटील, सागर पाटील, अक्षय देसाई, भूषण पाटील आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

पालिका शाळेत वृक्षारोपण उत्साहात

कऱ्हाड : राज्यात पटसंख्येमध्ये अव्वल असणाऱ्या येथील पालिका शाळा क्रमांक तीनमध्ये महिला शिक्षिका व महिला पालकांनी एकमेकींना वाण म्हणून एक झाड भेट देऊन वृक्षारोपण केले. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येईल. शाळा क्रमांक तीनमधील प्रत्येक विद्यार्थी व महिला पालकांनी एक झाड लावल्याने एकाचवेळी साधारणपणे पाच हजार झाडांचे रोपण होणार असल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षकांनीही शाळा परिसरात वृक्षारोपण केले.

Web Title: Excitement of Sadguru Magazine