‘जागर सावित्रीच्या लेखिकेचा’ उत्साहात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:31+5:302021-01-10T04:30:31+5:30

कुडाळ : जावळी पंचायत शिक्षण विभागामार्फत तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘उत्सव क्रांतिज्योती सावित्रीचा, जागर सावित्रीच्या लेखिकांचा’ या अभिनव ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन ...

In the excitement of 'Jagar Savitri's author'! | ‘जागर सावित्रीच्या लेखिकेचा’ उत्साहात !

‘जागर सावित्रीच्या लेखिकेचा’ उत्साहात !

कुडाळ : जावळी पंचायत शिक्षण विभागामार्फत तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘उत्सव क्रांतिज्योती सावित्रीचा, जागर सावित्रीच्या लेखिकांचा’ या अभिनव ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व महिला शिक्षक मोबाईल व फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित होत्या.

जावली पंचायत समिती शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अरुणा शिर्के, डाएटच्या प्राचार्या ज्योती मेटे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, अधिव्याख्याता राजश्री तिटकारे, महेंद्र जाधव उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत आपण सावित्रीच्या वारसदार आहोत, याची जाणीव करून दिली. त्यांची शिकवण, वसा जोपासला पाहिजे. आपल्या शिक्षणाच्या कार्यातून सावित्रीच्या लेकींनी कविता, पुस्तक लेखनाचा छंद जोपासला आहे, यांचा सन्मान केला जात आहे.’

ऑनलाईन ‘सावित्रीचा जागर’ या कार्यक्रमात तालुक्यातील महिला शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या कलाकौशल्याने वातावरण भरून टाकले होते. तीन तास चाललेल्या या ऑनलाईन सोहळ्यात माधुरी फरांदे यांनी अमोघ वाणीने उपस्थितांना सावित्रीच्या जन्मभूमी नायगाव येथेच पोहोचवले. उद्यमुख लेखिका कवयित्री अंजली गोडसे यांनी स्वलिखित ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई’ यांच्या जीवनावरील पुस्तकाचे समीक्षण केले. अनिता जाधव यांनी काव्यातून, तर सीमा पार्टे यांनी जात्यावरील ओव्यांचे सादरीकरण करत जुन्या काळाची आठवण करून दिली. शिल्पा फरांदे यांनी सावित्रीआजीला लिहिलेल्या पत्राला सर्वांनीच दाद दिली.

यावेळी अधिव्याख्याता राजश्री तिटकारे यांनी ‘सावित्रीबाई आणि स्त्रीशिक्षण’ याविषयी आपले विचार व्यक्त केले. सुनीता गंगावणे, सुवर्णा साळवी यांनी ‘मी सावित्रीबाई बोलतेय...’ या एकपात्री प्रयोगातून सावित्रीच साक्षात अवतरली. शशिकला शिंगटे, स्मिता पाटील, मंगल पिसाळ, रेखा शिर्के, मुक्ताबाई धनावडे आदींनी सहभाग नोंदवला.

याप्रसंगी ओझरे शाळेच्या सर्व बालचमूनी ‘अशी घडली सावित्री’ ही पाच मिनिटांची नाटिका सादर केली. कुडाळ शाळेतील छोट्या सावित्रीने आपल्या गायनातून आजच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख सरिता शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: In the excitement of 'Jagar Savitri's author'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.