रेठरेत कृष्णा महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:44+5:302021-03-24T04:36:44+5:30
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथालय समितीचे अध्यक्ष प्रवीणचंद्र ...

रेठरेत कृष्णा महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन उत्साहात
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथालय समितीचे अध्यक्ष प्रवीणचंद्र भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य साळुंखे यांनी मानवाच्या जीवनामध्ये ग्रंथ, ग्रंथालयाचे महत्त्व आणि ग्रंथालयामधील असणारी पुस्तके मानवाचे आयुष्य कसे बदलून टाकतात यावर मार्गदर्शन केले. तसेच ग्रंथालय समितीचे अध्यक्ष प्रवीणचंद्र भाकरे यांनी संदर्भग्रंथ आणि अभ्यासक्रमाची पुस्तके यांचा विद्यार्थ्यांना होणारा उपयोग याचे महत्त्व पटवून दिले.
ग्रंथपाल अमोल थोरात यांनी ग्रंथालयांमध्ये असणारी पुस्तके, त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि संदर्भ पुस्तके ही ग्रंथालयामध्ये किती उपलब्ध आहेत आणि ती विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने दिली जातात, यावर मनोगत व्यक्त केले. डॉ. पी. डी. भाकरे यांनी आभार मानले.