जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘उत्पादन शुल्क’चे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:41 IST2021-05-27T04:41:10+5:302021-05-27T04:41:10+5:30

सातारा : राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील भरारी पथकाने दि. २५ रोजी पुसेगाव, ता. खटाव व सोकासन, ता. ...

Excise raids at two places in the district | जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘उत्पादन शुल्क’चे छापे

जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘उत्पादन शुल्क’चे छापे

सातारा : राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील भरारी पथकाने दि. २५ रोजी पुसेगाव, ता. खटाव व सोकासन, ता. माण येथे छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व अबकारी अनुज्ञप्ती दि. २४ पासून सायंकाळी ५ पासून बंद केल्या आहेत. या कालावधीमध्ये मद्याची बेकायदेशीर निर्मिती, वाहतूक व विक्री वाहतूक यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, साताराचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने दिनांक २५ रोजी जिल्ह्यातील पुसेगाव, ता. खटाव व सोकासन ता. माण येथे बेकायदेशीर देशी, विदेशी, बिअर मद्यसाठ्‌यावर छापे टाकले. पुसेगाव येथून नसरुद्दीन अमानुल्ला मुल्ला (वय २९), सोकासन येथून अनिल शिवाजी बोडरे (वय ३०), अविनाश जगन्नाथ भोसले (वय ३०) व एक अज्ञात इसम यांच्या ताब्यातून एकूण देशी दारूचे ३७ बॉक्स, विदेशी दारूचे एकूण ६ बॉक्स व बिअरचे २ बॉक्स असा एकूण १ लाख ४५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण चारजणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, नितीन जाधव, महेश मोहिते, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, सचिन खाडे, किरण जंगम यांनी भाग घेतला. तपास निरीक्षक आर. एल. पुजारी हे करीत आहेत.

फोटो आहे:

Web Title: Excise raids at two places in the district