शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara- बनावट विदेशी दारू निर्मितीवर उत्पादन शुल्कची धडक कारवाई; सांगली, सोलापुरातील दोघांना अटक

By दत्ता यादव | Updated: April 7, 2023 13:45 IST

गोवा राज्यातील दारूचा वापर करून बनावट विदेशी दारू तयार करत हाेते

सातारा : गोवा राज्यातील दारूचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या बनावट विदेशी दारू निर्मितीवर उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून सांगली आणि सोलापुरातील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूच्या १८८ बाटल्या, ३०० मोकळ्या बाटल्या, ७०० नग बुचे, तीन मोबाइल, दोन दुचाकी असा १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे करण्यात आली.अक्षय राजेंद्र जाधव (वय २७, सध्या रा. दुर्गळवाडी, पो. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा, मूळ रा. मु. पो. ताकारी, ता. वाळवा, जि. सांगली), हर्षवर्धन भगवान कर्चे (वय २३, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तारगाव, ता. कोरेगाव येथे बनावट विदेशी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती साताऱ्याच्या उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने सायंकाळी तेथे जाऊन छापा टाकला. यावेळी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अक्षय जाधव आणि हर्षवर्धन कर्चे यांना अटक केली. हे दोघे गोवा राज्यातील दारूचा वापर करून बनावट विदेशी दारू तयार करत हाेते. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या १८८ सीलबंद बाटल्या, ३०० मोकळ्या बाटल्या, ७०० नग बुचे, तीन मोबाइल, दोन दुचाकी असा १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्पादन शुल्कचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, जवान सचिन खाडे, अजित रसाळ, जीवन शिर्के, भीमराव माळी, उर्वेश पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. याबाबत पुढील तपास दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस