शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: माजी सैनिकाची रायफल केली लंपास, बहीण भावाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:26 IST

बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने डबल बोअरची रायफल आणि १४ जिवंत काडतुसे चोरून नेली होती.

सातारा : वर्णे, ता. सातारा येथील माजी सैनिक संजय मुरलीधर जातक (वय ५७) यांची डबल बोअर रायफलची चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आज, बुधवारी बहीण-भावाला अटक केली. त्यांच्याकडून चोरीची रायफल तसेच १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.प्रवीण रामू पवार (वय १९), संगीता विजय राठोड (३०, सध्या रा. जनाई मळाई मंदिराच्या पायथ्याला चंदननगर, कोडोली सातारा, मूळ रा. उडगी, ता. बागेवाडी, जि. विजयपूर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या बहीण-भावाची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय जातक हे सैन्य दलातून निवृत्त झाले असून, ते साताऱ्यातील देगाव फाट्याजवळील संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. १२ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने डबल बोअरची रायफल आणि १४ जिवंत काडतुसे चोरून नेली होती. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी आणि कर्मचारी याचा तपास करत असतानाच त्यांना या बहीण-भावाकडे एक रायफल असून, ती त्यांनी त्यांच्या झोपडीवजा घरात लपवून ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोडोली येथे जाऊन प्रवीण आणि संगीताला अटक करुन त्यांच्याकडून चोरीची रायफल जप्त आणि काडतुसे जप्त केली.हे दोघे कर्नाटकातून ऊसतोडीच्या कामासाठी आले होते. या दोघांनी आणखी कुठे चोरी केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम निकम, संतोष कचरे आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी