सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:37+5:302021-02-18T05:14:37+5:30
सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरणाची गती मात्र वाढवणे गरजेचे आहे. कारण लस देण्याची ...

सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार
सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरणाची गती मात्र वाढवणे गरजेचे आहे. कारण लस देण्याची गती वाढविली नाही तर सर्वांना लस मिळण्यासाठी अजून वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना लस देण्यात येत आहे. जे कर्मचारी फ्रंटवर काम करत आहेत, अशा लोकांना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. सुरुवातीला तब्बल २५ हजार कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात लस घेण्याची वेळ आली, तेव्हा अनेकांनी माघार घेतली. दिवसाला १५० ते २१० जणांना लस दिली जात आहे. जिल्ह्यातून एकूण १६ केंद्रे असून, आता कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लस देण्याची केंद्रेही वाढविण्यात येणार आहेत.
चाैकट :
डोस उपलब्ध, मग गती का वाढत नाही
जिल्ह्यात सुरुवातीला ३० हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर पुन्हा १५ हजार डोस उपलब्ध झाले. सध्या १७ हजार १०० इतक्या लसी उपलब्ध आहेत. असे असताना लस घेण्याची गती वाढत नाही. याची मुख्य कारण म्हणजे लसीसंदर्भांत लोकांमध्ये असलेला संभ्रम. या संभ्रमामुळे लस घेताना अनेकजण विचार करत आहेत. ज्यांनी घेतली. त्यांना सतत विचारून भंडावून सोडत आहेत. तुमचा अनुभव कसा काय, काही रिॲक्शन येत नाही ना, अशा विनाकारण शंका उपस्थित करून स्वत:चा संभ्रम निर्माण करत आहेत.
चाैकट :
२१० जणांना जिल्ह्यात रोज लस दिली जात आहे.
२९,२२६ जणांना आतापर्यंत लस दिली.
कोट :
लसीची गती वाढविण्यासाठी आता १६ केंद्रांएवजी आणखी काही केंद्रे वाढविण्याचा विचार आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल. सध्या फ्रंटवर काम करणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. डोसचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे. कोणालाही त्रास झाला नाही. नागरिकांनी अफवा पसरवून संभ्रम निर्माण करू नये.
- डाॅ. सुभाष चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
चाैकट :
दहा दिवसात ७५८ नवे रुग्ण
एकीकडे कोराेनाची लस उपलब्ध झाली असली तरी, दुसरीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गत दहा दिवसांत तब्बल ७५८ नवे रुग्ण आढळून आले असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांची बेफिकिरी याला कारणीभूत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना अनेकजण तोंडाला मास्क न लावताच फिरत आहेत. अशा लोकांवर खर तर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईल.
चाैकट :
रोज कुठल्या केंद्रावर किती लस