प्रत्येकाने काळाप्रमाणे बदल करायला शिकले पाहिजे : यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:00+5:302021-08-27T04:42:00+5:30
येथील श्रीमळाई देवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेजमधील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ...

प्रत्येकाने काळाप्रमाणे बदल करायला शिकले पाहिजे : यादव
येथील श्रीमळाई देवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेजमधील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बी. बी. पाटील होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पी. जी. पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, प्राचार्य एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक ए. एन. शिर्के, पर्यवेक्षिका ए. एस. कुंभार, शरद तांबेकर, मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
सचिव अशोकराव थोरात म्हणाले, ‘अतिवृष्टी, चक्रीवादळे, कोरोना ही मानवाला अंतर्मुख करायला लावत आहेत. याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या जागी दुसरी व्यक्ती भरली तरी त्या कामाची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही. प्रत्येकाने स्वतःमध्ये असलेले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’
डॉ. स्वाती थोरात म्हणाल्या, ‘नियोजनबद्धता व शिस्त ही मानवाला यशस्वीतेकडे घेऊन जाते. प्रत्येकाने आपल्या जीवनात नियोजन, शिस्त व चिकाटी ठेवली तर कोणतीही अवघड गोष्ट सोपी होते. जीवन खूपच सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्यायला शिकला तोच खरा मनुष्य होय.’
या वेळी आदर्श ज्युनियर कॉलेजच्या विभाग प्रमुख शीला पाटील, एस.बी. शिर्के, आर.आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
एस. वाय. गाडे यांनी प्रास्ताविक केले. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. कुंभार यांनी आभार मानले.