पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी : वासुदेव काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:52+5:302021-08-14T04:43:52+5:30
ओगलेवाडी : यावर्षी निसर्गाने मोठे संकट निर्माण केल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार या पूरस्थितीत उद्ध्वस्त ...

पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी : वासुदेव काळे
ओगलेवाडी : यावर्षी निसर्गाने मोठे संकट निर्माण केल्याने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार या पूरस्थितीत उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या लोकांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे. पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हस्ते मदत केली पाहिजे’, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.
पाल (ता. कऱ्हाड) येथील पूरग्रस्तांना भाजप किसान मोर्चाच्यावतीने मदत वाटप कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, कऱ्हाड उत्तर सरचिटणीस शंकरराव शेजवळ, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र चव्हाण, सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा रोहित चिवटे, सूर्यकांत पडवळ, शहाजी शिंदे, रामदास शिंदे, महेंद्र साळुंखे, शंकर पाटील, राजू पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, प्रकाश जगताप, धनंजय घाडगे, अरुण जगदाळे, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.