समाजाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज राहावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:40+5:302021-09-02T05:23:40+5:30

पाटणच्या ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९९५ व १९९७ च्या बॅचमधील विद्यार्थी, शिक्षकांचे कोरोना जनजागृती शिबिर कऱ्हाड ...

Everyone should be ready for the protection of the society! | समाजाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज राहावे!

समाजाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज राहावे!

पाटणच्या ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९९५ व १९९७ च्या बॅचमधील विद्यार्थी, शिक्षकांचे कोरोना जनजागृती शिबिर कऱ्हाड तालुक्यातील बेलदरे येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. शिबिरात डॉ. राहुल साळुंखे यांनी ‘कोरोनाचे बदलते स्वरूप व घ्यावयाची काळजी’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच केडियस कॉर्पाेरेशन, पुणे या संस्थेने उपस्थितांना कोरोना प्रतिबंधित साहित्याचे वाटप केले. सह्याद्रीत असणाऱ्या ऋतुवर्गीय वनौषधीची माहिती अनिल बोधे यांनी दिली.

अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील म्हणाले, कोराेना काळात प्रशासकीय विभागासोबत प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने कोरोना थोपवण्यासाठी सज्ज व्हावे. सुरक्षित अंतर, स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर हे सहज शक्य असणारे उपाय आहेत. त्याचे तंतोतंत पालन करावे. प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे.

यावेळी उपस्थित शिक्षकांना मानाचा फेटा, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अप्पर पोलीस अधिकीषक धीरज पाटील यांना सर्व मित्र-मैत्रिणींच्यावतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

- चौकट

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

ज्यांनी वयाच्या सोळाव्या व अठराव्यावर्षी वर्गात एकत्रित दंगा, मस्ती केली, शाळेत अभ्यासाचे धडे गिरवले, त्याच वर्गातील तेच चेहरे चाळीस वर्षांनंतर एकत्र आले. केस पांढरे, डोळ्यांना चष्मा, तर सोबत लहान मुले. कोणी नोकरीला, कोणी व्यावसायिक, कोणी डॉक्, तर कोणी शेतकरी; मात्र प्रत्येकाने आपले व्याप बाजूला ठेवून केवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व गुरूजनांचा सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

फोटो : ३१केआरडी०१

कॅप्शन : बेलदरे (ता. कऱ्हाड) येथे आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे भाषण झाले. (छाया : नीलेश साळुंखे)

Web Title: Everyone should be ready for the protection of the society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.