शेतकऱ्यांबद्दल प्रत्येकाने कृतज्ञता दाखवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:16+5:302021-02-05T09:13:16+5:30
येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात दिवंगत शेतकरी प्रा. पांडुरंग पुजारी स्मृतिदिनाचे औचित्य साधून परिसरातील उद्यमशील, प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार आयोजित केला ...

शेतकऱ्यांबद्दल प्रत्येकाने कृतज्ञता दाखवावी
येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात दिवंगत शेतकरी प्रा. पांडुरंग पुजारी स्मृतिदिनाचे औचित्य साधून परिसरातील उद्यमशील, प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जितेंद्र डुबल होते. यावेळी कुसुमताई पुजारी, प्रगतशील शेतकरी संभाजी भोसले, अनिकेत यादव, सुनील पवार, सचिन पाटील, संजय गोरे, प्रल्हाद माने, अर्जुन कापूरकर, चंद्रकांत साठे, संस्थेचे अध्यक्ष पी. जी. पाटील, डॉ.स्वाती थोरात, प्रा संजय थोरात, वसंतराव चव्हाण, शेखर शिर्के यांच्यासह शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना फेटा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. काळ्या आईची सेवा करणारा कधी उपाशी राहू शकत नाही. त्या शेतीची जाण ठेवून शेतीकडे पहावे, अशा भावना सत्काराला उत्तर देताना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. एस. डी. पाटील व एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य एस. वाय. गाडे यांनी आभार मानले.