शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा

By दीपक देशमुख | Updated: August 5, 2025 16:51 IST

लोकानुनय करणाऱ्या घोषणा करताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत असल्याने सरकारची दमछाक

दीपक देशमुखसातारा : गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन आठवड्यावर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिधाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा शिधा मिळणार काय ? असा सवाल गोरगरीब जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शासनाने ऐनवेळी घोषणा केल्यास शासनाच्या वितरण व्यवस्थेवरही मोठा ताण येणार असून, सण संपल्यानंतर लोकांच्या हाती शिधा पडणार आहे. त्यामुळेच वेळीच निर्णय करून गरिबांचा सण गोड करावा, अशी मागणी होत आहे.शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने वर्षभरातील महत्त्वाच्या सण - उत्सवात लाभार्थींना शंभर रुपयात आनंदाच्या शिधाचे वितरण करण्यात येते. गेल्यावर्षी गौरी-गणपतीचा सण ७ सप्टेंबर २०२४ रोजी होता. त्यावेळी आनंदाचा शिधा देण्याचा शासननिर्णय जवळपास दोन महिने अगोदर दि. १२ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला होता. तरीही सणादिवशी अनेकांना शिधा मिळाला नाही. पितृ पंधरवडा संपल्यानंतरही वाटप सुरूच होते. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शिधासंच वाटपाला दोन महिनेही अपुरे पडले. यंदा ४.२८ कार्डधारक आहेत. गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला असून, तीन आठवडे उरलेत. तरीही शिधाची अधिकृत घोषणा झालेली नाही. ऐनवेळी घोषणा केल्यास वाटपाचे नियोजन करून शिधा हाती पडायला उशिर होणार आहे. त्यामुळे गरिबांचा सण शासन गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित आहे.

शासनाची दमछाकलोकानुनय करणाऱ्या घोषणा करताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत असल्याने सरकारची दमछाक होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. याच आर्थिक ताणामुळे अनेक शासकीय कामांची बिले रखडल्याचा आरोप होत आहे. आता ‘आनंदाचा शिधा’ रखडतोय का, असा सवाल उपस्थित होत असून, नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

प्रशासनावरही ताण आनंदाच्या शिधाच्या निविदा, शिधा जिन्नसाचा संच बनवणे, प्रत्येक जिल्ह्यातील गोदामात पोहोच करणे आणि तेथून स्वस्त धान्य दुकानापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. मात्र, ऐनवेळी घोषणा केल्यास 'आनंदाचा शिधा' वेळेत देणे शक्य होणार नाही.मागील शिधासंचातील जिन्नस शंभर रुपयातयोजना जाहीर झाल्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून आनंदाचा शिधा शंभर रुपयात देण्यात येतो. यामध्ये प्रत्येकी एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल असा शिधासंच मिळतो.