शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 14:11 IST

Rain Flood Satara :सातारा जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसं पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत!

ठळक मुद्देअस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांना विविध सेवाभावी संस्थाकडून मदतीचा ओघ सुरु

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसं पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत!जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने मदत कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखा येथे करण्यात आली आहे. या शाखेचे पथक प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते या असून जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्था तसेच नागरिकांनी मदत दयावयाची असेल त्यांनी जिल्हा पुरवठा शाखेत मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले, त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहचणे आवश्यक असल्याने बिस्कीट, चिवडा, फरसाण, राजगिरा लाडू या स्वरुपामध्ये स्नॅक्स तसेच साखर, तांदूळ, आटा, डाळ, तेल, तिखट, मीठ इतर कोरडा शिधा तसेच ब्लँकेट, चादरी, टॉवेल, ताडपत्री अशा स्वरुपाची मदत करण्याचे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले होते.जिल्ह्यातील सामाजिक संघटना व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसादानंतर जमा झालेल्या मदत तातडीने पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पाठविण्यात आली आहे. मदत ही संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत गरजूंना वाटप करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून २४ जुलै च्या शासन निर्णयानुसार पुरबाधीत कुटुंबांना प्रतीकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर कोरोसीनचेही वाटप करण्या आले आहे. वाटप हे ग्रामदक्षता समिती सदस्यांसमोर करण्याची सूचना देण्यात आली असून वाटपात गैरप्रकार केल्यास संबंधितावर गंभीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.जिल्हा प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी मदत दिली आहे. यामध्ये सातारा तालुका रेशन दुकान संघटना, शंकर बर्गे, सुलतानवाडी ता. कोरेगाव, संजय निकम, जयंत गरज, कोविड डिफेडर ग्रुप, सातारा, मच्छींद्र गोरे, सातारा, हेमंत त्रिगुणे, श्रीकांत शेटे, सातारा, तहसील कार्यालय, सातारा, पार्ले-जी कंपनी, शुभम-इन हॉटेल, क्रेडाई, सातारा, श्री स्वामी सेवा मेडिकल फौंडेशन, एमएसडब्ल्यु महाविद्यालय, जकातवाडी, अण्णासाहेब कल्याणी माजी विद्यार्थी बॅच, जाणीव विकास स. संस्था, दिलीप देशमुख, मे. पालेकर फूड, विठ्ठल भोसले, कांचन शेटे, राजधानी हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असो. सातारा, कोडोली कृतज्ञता मंच व कोडोली ग्रामस्थ, बौद्ध विकास तरुण मंडळ लिंब, मार्सिया मेटर इंडिया, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, वसुंधरा पर्यावरण संस्था व सातारा व कोरेगाव येथील शासकीय गोदामातील व वाहतुकदारांचे हमाल कामगार यांनी पुरग्रस्तांसाठी मदत जिल्हा पुरवठा कार्यालयात जमा केली आहे.

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील छोट्या छोट्या मित्र मंडळांनी, सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपल्या परीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.पुनर्वसनाचे काम करण्यावरही भरपाटण, वाई, जावली, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्सखलन झाले असल्याने बाधित लोक भयग्रस्त असल्याने आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या लोकांनी नोडल अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडेही मागील आठवड्यात हीच मागणी करण्यात आलेली होती. 

 

टॅग्स :floodपूरRainपाऊसSatara areaसातारा परिसर