शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर; सातारा जिल्ह्यातील 'इतके' शेतकरी प्रतीक्षेत

By नितीन काळेल | Updated: September 15, 2023 18:43 IST

लाभ कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष 

सातारा : नियमीत पीक कर्जफेडमधील राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात करुन महिना उलटून गेला तरीही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. सातारा जिल्ह्यातील अशा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या तर २० हजारांवर आहे. त्यामुळे कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर, ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.राज्यात पावणे चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नियमित कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा केली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करुन प्रमाणिकरण केले. नंतरच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. त्यातच सत्ता बदलानंतर आताच्या राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील यादी गेल्यावर्षी दिवाळीच्या अगोदर जाहीर झाली होती. तर दुसरी यादी गेल्यावर्षीच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली. ही यादी सर्वांत मोठी होती. आतापर्यंत १ लाख ९५ हजार ७९४ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झालेली आहे. असे असलेतरी अजुनही जिल्ह्यातील २० हजारहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे बॅंकेतील हेलपाटे सुरूच आहेत. लाभ कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीbankबँक