‘केबी’स्पोर्ट्स क्लबची स्थापना : सचिन यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:36 IST2021-02-14T04:36:23+5:302021-02-14T04:36:23+5:30
फलटण : के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या केबी फाउंडेशनच्या अंतर्गत केबी ...

‘केबी’स्पोर्ट्स क्लबची स्थापना : सचिन यादव
फलटण : के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या केबी फाउंडेशनच्या अंतर्गत केबी स्पोर्टस् क्लबची स्थापना करण्यात आली असून, या क्लबच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील खेळाडूंचा क्रिकेट संघ निवडण्यात आला आहे.
या निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार नुकताच सचिन यादव यांच्या हस्ते झाला. यावेळी संघातील खेळाडूंना क्रिकेट कीटचे वाटप करण्यात आले. अनेक दिवसांचा खेळाडूंचा शोध आणि अनेक प्रकारच्या चाचण्यांनंतर केबी क्रिकेट टीमसाठी फलटण तालुक्यातील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
केबी हा क्रिकेट संघ राज्यात विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून, संघात निवड झालेल्या खेळाडूंना केबी उद्योग समूहाच्यावतीने प्रतिमहिना मानधन, प्रोटिन्स, स्पर्धेवेळीचा संपूर्ण खर्च, उच्च सुख सुविधा, संपूर्ण कीट याबरोबरच खेळात सातत्य ठेवल्यास के. बी. उद्योग समूहात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. यानिमित्ताने या खेळाडूंना आर्थिक स्थैर्य लाभेल, असा विश्वास सचिन यादव यांनी व्यक्त करून आगामी काळात केबी स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून इतरही क्रीडा प्रकारचे संघ बनविण्यात येणार असल्याचे सचिन यादव यांनी सांगितले. (वा.प्र.)
१३केबी
केबी स्पोर्टस् क्लबची स्थापना करण्यात आली असून, या क्लबच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील खेळाडूंचा क्रिकेट संघ निवडण्यात आला आहे.