पर्यावरणपूरक गणपती चळवळ घरोघरी पोहोचणे गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:09+5:302021-08-27T04:42:09+5:30
वाई : ‘पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यांचे दुष्परिणाम संपूर्ण जगात दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येक माणसाचे ...

पर्यावरणपूरक गणपती चळवळ घरोघरी पोहोचणे गरज
वाई : ‘पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यांचे दुष्परिणाम संपूर्ण जगात दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. आपले सण-समारंभ पर्यावरणपूरक असावेत, रोटरी क्लबने राबविलेले उपक्रम विधायक असून, पर्यावरणपूरक गणपती चळवळ घरोघरी पोहोचणे काळाची गरज आहे,’ असे मत डॉ. ओक यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ‘मीच बनवणार माझा इकोफ्रेंडली बाप्पा’ ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बागडे, सचिव डॉ. प्रेरणा ढोबळे, डॉ. जितेंद्र पाठक, मदनकुमार साळवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपक बागडे म्हणाले, ‘पर्यावरण व पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नियंत्रण मंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, यासाठी शहरातील चिमुकल्यांनी मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या व अनेक गणपतीची रुपे साकारलेली आहेत.’ यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक मूर्ती बनवून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उपक्रमात डॉ. अनघा दातार व डॉ. मनोहर दातार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
यावेळी चिमुकल्यानी २५ हून अधिक शाडूच्या मातीपासून गणपती बनवले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा पोरे, तारका कांबळी, अर्चना पाठक, मंगला चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
२६वाई
रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ‘मीच बनवणार माझा इकोफ्रेंडली बाप्पा’ ही कार्यशाळा घेण्यात आली. (छाया : पांडुरंग भिलारे)