शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाभिमुख आराखडा सादर, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:13 IST

महाबळेश्वर : सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार नवीन महाबळेश्वर या क्षेत्रासाठी पर्यावरण संवर्धनाभिमुख पर्यटन व सर्व ...

महाबळेश्वर : सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार नवीन महाबळेश्वर या क्षेत्रासाठी पर्यावरण संवर्धनाभिमुख पर्यटन व सर्व समावेशक विकास योजना तयार करण्यात आली आहे. या आराखड्याचे सादरीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय दरे (ता.महाबळेश्वर) दौऱ्यावर आले आहेत. या निमित्ताने त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, सर्व सातारा जिल्हा हा पर्यटन जिल्हा करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगितले. सातारा, जावळी, महाबळेश्वर आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समावेश आहे. पर्यटन वाढीसह समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पर्याय यात समाविष्ट केले आहेत, तसेच या प्रकल्पामुळे १,१५३ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या जैवविविधतेच्या पर्यावरण संवर्धनासह संरक्षित आणि शाश्वत विकास होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रस्ते विकास महामंडळाने संविधानिक प्रक्रियेचा अवलंब करून, केंद्र व राज्य शासनाने पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र, कोयना वन्यजीव अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, संवर्धन क्षेत्र, हेरिटेज क्षेत्र या क्षेत्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, अशा प्रकारचे सादरीकरण केले आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा सह्याद्रीसह कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाशी एकरूप असून, उत्तरेस थेट तापोळा, कांदाट व सोळशी खोऱ्यापासून ते दक्षिणेकडील कोयना धरण भिंत, हेळवाक, मराठवाडी वाल्मीकी पठारापर्यंत स्थित आहे. नव्याने काही गावांचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्व शक्यतांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

चार भागात विभाजनप्रारूप विकास योजनेनुसार, हे संपूर्ण क्षेत्र चार नियोजन विभागांत विभाजित केलेले आहे. उत्तरेकडील महाबळेश्वर, उत्तर पश्चिमस्थित जावळी, पूर्वस्थित सातारा, तर दक्षिणेकडील पाटण असे चार भाग असणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानEknath Shindeएकनाथ शिंदे