तांबवेत शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:34+5:302021-08-25T04:43:34+5:30
जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. मंडल कृषी अधिकारी सुशांत भोसले, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ...

तांबवेत शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्साहात
जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. मंडल कृषी अधिकारी सुशांत भोसले, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, र. ह. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना माहितीपर किटचे वाटप जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील व उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भात पिकावरील कीड रोगाबाबत मंडल कृषी अधिकारी भोसले, कृषी पर्यवेक्षक कोळेकर यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी साहाय्यक वैभव नाळे यांनी प्रास्ताविक केले. कृषी साहाय्यक अस्लम मुल्ला यांनी आभार मानले.
फोटो : २४केआरडी०२
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथे कृषी विभागामार्फत भात पिकाबाबत शेतकऱ्यांची शेती कार्यशाळा घेण्यात आली.