आलेवाडी येथे लसीकरण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:11+5:302021-09-17T04:47:11+5:30
सातारा : आलेवाडी, ता. जावली येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष सहकार्यातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण उत्साहात पार पडले. या ...

आलेवाडी येथे लसीकरण उत्साहात
सातारा : आलेवाडी, ता. जावली येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष सहकार्यातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण उत्साहात पार पडले. या शिबिरात दोनशे नागरिकांना कोरोना लस देण्यात आली.
आलेवाडी येथील श्रीकांत पवार यांनी आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्याची विनंती आ. शिवेंद्रसिंहराजे यांना विनंती केली. त्यानुसार आलेवाडीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला जावलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचेही सहकार्य लाभले. आलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या शिबिरात दोनशे ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच मंगेश पवार, सर्व सदस्य यांच्यासह श्रीकांत पवार, राजेंद्र भिलारे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पवार, साहेबराव पवार, अजित पवार, संजय बांदल, नैतिक पवार, सुनील पवार, यशवंत पवार आदींनी परिश्रम घेतले.