निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:39+5:302021-02-05T09:11:39+5:30
वडूज : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना ...

निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
वडूज : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विषयावर आयोजित करण्यात
आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
खटाव पंचायत समितीचा आरोग्य विभाग, युवा संकल्प सोशल फाउंडेशन व सुरेखा बाळासाहेब मोरे
संचलित सदिच्छा हॉस्पिटल यांच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील ६ ते १४ वर्षे वयोगटात अनुक्रमे अथर्व देशमुख, तनिष्का माने (वडूज). द्वितीय क्रमांक - धनश्री जाधव, मायणी. क्षितीज मोरे, वडूज; तर तृतीय क्रमांक इंदिरा पोतदार, खटाव यांना देण्यात आला. १४ ते १८ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक गायत्री विभूते, म्हासुर्णे; द्वितीय क्रमांक - वैष्णवी माने, म्हासुर्णे; तृतीय क्रमांक- रूपाली काटे, वडूज हिला देण्यात आला.
खुला गटात प्रथम क्रमांक पूजा पिटके, मायणी, रवीना यादव, वडूज. द्वितीय क्रमांक - प्रीती गुंजवटे, खटाव. तृतीय क्रमांक - रमेश भोसले, खटाव हे विजेते ठरले. विजेत्यांना तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.