शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर पत्नीसह अभियंता पती ठार, भोसलेवाडीत दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:19 IST

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत पुणे बाजूकडून कोल्हापूरकडे निघालेली भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने उलटी झाली. या अपघातात डॉक्टर पत्नीसह अभियंता पतीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

ठळक मुद्देडॉक्टर पत्नीसह अभियंता पती ठार, भोसलेवाडीत दुर्घटनामुलांना आणायला जाताना कारला अपघात

उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत पुणे बाजूकडून कोल्हापूरकडे निघालेली भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने उलटी झाली. या अपघातात डॉक्टर पत्नीसह अभियंता पतीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.अमित अप्पाजी गावडे (वय ३८), डॉ. अनुजा अमित गावडे (३५, दोघेही रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-पुणे येथील ग्रीन फिल्ड सोसायटीत राहणारे अमित गावडे व त्यांची पत्नी डॉ. अनुजा हे दोघेजण शनिवारी सकाळी कारने (एमएच १२ जेयू ८८९२) पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते.

महामार्गावर वाहने कमी प्रमाणात असल्यामुळे भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचा भोसलेवाडी गावच्या हद्दीत कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून कऱ्हाडकडून सातारा जाणाऱ्या लेनवर जाऊन उलटी झाली. यामध्ये कारमधील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.गावडे दाम्पत्य कोल्हापूरमध्ये असणाऱ्या त्यांच्या मुलांना आणण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघाताची नोंद उंब्रज पोलिसांत झाली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर