कंटेनरने चिरडल्याने जीवलग मित्रांचा अंत
By Admin | Updated: April 15, 2015 00:19 IST2015-04-15T00:19:43+5:302015-04-15T00:19:43+5:30
फलटणवर शोककळा : जेवण करुन ट्रककडे परतताना काळाचा घाला

कंटेनरने चिरडल्याने जीवलग मित्रांचा अंत
फलटण : फलटण शहरातील दोन जीवलग मित्रांवर नेवासे रस्त्यावरील वडाळा हद्दीत काळाने घाला घातला. एका ढाब्यावर जेवन करुन स्वत:च्या ट्रककडे जात असताना आलेल्या भरधाव ट्रकने दोघांना चिरडले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त येऊन धडकताच फलटणमध्ये शोककळा पसरली.
याबाबत माहिती अशी की, युसूफ इस्माईल शेख (वय ४०, रा. हत्तीखाना, कसबा पेठ, फलटण) यांचा मालट्रक आहे. या ट्रकमधून ते अनेकदा मालाची वाहतूक करत असतात. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र महेश दत्तात्रय वेदपाठक (३०, रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) हेही असत. युसूफ शेख व महेश वेदपाठक हे रविवार, दि. १२ रोजी मालट्रक घेऊन नेवासेकडे निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास वडाळा येथील एका ढाब्यावर जेवून करुन ते त्यांच्या मालट्रककडे जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने दोघांनाही चिरडले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त फलटण शहरात येऊन धडकताच शोककळा पसरली. युसूफ शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले तर महेश यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण अस परिवार आहे. (प्रतिनिधी)