भांडेवाडीचं अतिक्रमण विधानसभेत गाजलं

By Admin | Updated: October 12, 2015 00:30 IST2015-10-11T22:09:54+5:302015-10-12T00:30:21+5:30

राजकीय दबाव : गायरानात बांधलेले घर पाडण्यासाठी चक्क तीन आमदारांनी लावली प्रतिष्ठा पणाला

The encroachment of Bhandewadi was done in the Legislative Assembly | भांडेवाडीचं अतिक्रमण विधानसभेत गाजलं

भांडेवाडीचं अतिक्रमण विधानसभेत गाजलं

खटाव : अतिक्रमणाचा विषय म्हटलं तर स्थानिक पातळीवरही काही मिनिटांत निकाली काढण्यासारखा; पण भांडेवाडीतील गायरानावरील अतिक्रमण भलतंच गाजलं. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह तीन आमदारांनी विधानसभेत हा विषय अतारांकित बनविला आहे. दरम्यान, ‘अतिक्रमणाच्या नावाखाली शेतकऱ्यावर राजकीय आकसातून अन्याय केला जात आहे,’ असा आरोप वयोवृद्ध शेतकरी जयराम फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.राज्यभर खळबळ निर्माण करणाऱ्या घटनेची माहिती अशी की, भांडेवाडी येथे गायरान जमिनीवर घर बांधून अतिक्रमण केल्याबद्दलजयराम गणू फडतरे यांना घर पाडण्याचा शासनाचा आदेश आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांचा मुलगा राजेंद्र फडतरे यांचे घर पाडण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाचा आदेश एकाच्या नावे आणि पाडण्याची प्रकिया दुसरीकडे असे चित्र निर्माण झाले आहे. जयराम फडतरे यांनी ‘माझ्या नावे आदेश असल्यामुळे माझे घर पाडले तरी माझी कोणतीच हरकत नाही,’ असे यापूर्वीही सांगितले आहे. परंतु त्यांच्या मुलाच्या नावाने कोणताच आदेश किंवा नोटीस नसताना त्याचे घर पाडण्यासंबंधीच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.’
वास्तविक पाहता शासनाच्या गायरानावर केवळ जयराम फडतरे यांचे घर नसून अन्य ३३ जणांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. मग एकट्या जयराम गणू फडतरे यांनाच का वेठीस धरले जात आहे. हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.
विधानसभेत आमदार शशिकांत शिंदे, मोहोळचे आमदार रूपेश कदम, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत भांडेवाडीमधील गट नं ४०९ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण झाल्याबाबत ‘अ’ तारांकित प्रश्नसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भांडेवाडी येथील गट क्रमांक ४०९ मध्ये अतिक्रमण झाले आहे. येथे अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले असल्यामुळे येथील रस्ता बंद झाला आहे.
या रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण काढण्यासाठी खटाव (वडूज)चे तहसीलदारांनी गट विकास अधिकाऱ्यांना १८ सप्टेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे कळविले आहे. अतिक्रमण केलेले असल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी ते काढलेले नसल्यास त्याची कारणे काय आहेत.
अतिक्रमण काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली. या संदर्भात अतारांकित प्रश्न विधानसभेत मांडण्यात आल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत फडतरवाडी यांचे मार्फत जयराम फडतरे यांच्या नावे आदेश काढून त्यांना दिला. प्रशासनाचा आदेश एकाचे नावे घर पाडण्याच्या हालचाली दुसऱ्याचे अशा हालचाली वेग धरू लागल्या आहेत. (वार्ताहर)



३२ अतिक्रमणे सोडून फडतरेच ‘टार्गेट’
गायरानावर अतिक्रमण झाले असल्याचे सांगत माझे घर पाडण्याचा आदेश ग्रामपंचायतीने दिला आहे. मी घर पाडण्यास तयार आहे. माझ्या नावाचा आदेश असताना याच गट क्रमांकात माझ्या मुलाच्या नावे असणारे घर पाडण्याचा घाट का घातला जात आहे. माझ्याबरोबर इतर ३३ लोकांचे त्याच गायरानावर अतिक्रमण असताना त्यांना कोणतीच नोटीस नाही. परंतु, मला मात्र आदेश काढून घर पाडण्यासंदर्भात दबाव आणला जात आहे. मोजणीत १७० उंबरे अतिक्रमणात येत आहेत. त्यांच्यावर काय कार्यवाही करणार आहेत. अतिक्रमणात येणाऱ्या सर्वांना वगळून फक्त माझ्याच नावाने विधानसभेत तारांकित प्रश्न कसा विचारला गेला. हा तर सरासर अन्याय आहे. आमच्या कुटुंबावर अन्याय झाला तर मी आत्मदहन करणार आहे, असा इशाराही शेतकरी जयराम फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.


घर पाडण्यासाठी हालचाली
फटतरे यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून घर पाडण्याचा घाट केला जात आहे. ग्रामपंचायत भांडेवाडीकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ अन्वये अतिक्रमण काढण्याचे व अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. तरीही ठोस कारवाई केली जात नसल्याच्या लेखी पत्रामुळे ग्रामपंचायतीतर्फे घर पाडण्याच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे.

Web Title: The encroachment of Bhandewadi was done in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.