शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शिक्षण मंडळाच्या लिपिकाला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:08 IST

पालिकेच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक देण्यासाठी १४ हजारांची लाच घेणारा पालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजूरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या शिक्षेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपालिका शिक्षण मंडळाच्या लिपिकाला सक्तमजुरीवेतनश्रेणीसाठी घेतली होती लाच; शिक्षण क्षेत्रात खळबळ

सातारा : पालिकेच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक देण्यासाठी १४ हजारांची लाच घेणारा पालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजूरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या शिक्षेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, नवाळे हा सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळात मुख्य लिपिक म्हणून नोकरी करत होता. पालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांच्या पगारातील वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक काढून देण्यासाठी नवाळे यांना एकूण सात शिक्षकांना प्रत्येकी दोन हजार असे १४ हजार रुपये लाच म्हणून मागितले होते.त्यानंतर त्या सातपैकी एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २६ आॅगस्ट २०१४ रोजी तक्रार दिली होती.

तक्रार अर्ज आल्यानंतर एसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाकी कुरळे यांनी लाच मागणीची पडताळणी करून नवाळे याला पडकडण्यासाठी २६ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी नवाळे हा १४ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडला होता.तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एन.एल.मोरे यांच्यसमोर झाली. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीशांनी नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजूरी शिक्षा सुनवाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणSatara areaसातारा परिसर