हस्तकलाकारांसाठी खुले होणार रोजगाराचे दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:17+5:302021-09-02T05:25:17+5:30
पुसेसावळी : हस्तकलाकारांना एका छताखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून, त्यासाठी हस्तकला विभागामार्फत सप्टेंबर महिन्यापासून प्रशिक्षण कार्यशाळेचे ...

हस्तकलाकारांसाठी खुले होणार रोजगाराचे दालन
पुसेसावळी : हस्तकलाकारांना एका छताखाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून, त्यासाठी हस्तकला विभागामार्फत सप्टेंबर महिन्यापासून प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले जाईल, अशी माहिती विजय कोकाटे यांनी दिली.
जयरामस्वामींचे वडगाव येथे ''साथी'' फाैंडेशन, शेनवडी (ता. खटाव) या संस्थेच्या माध्यमातून व हस्तकला
विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. हस्तकलाकार आणि कारागीर यांचा कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार
निर्मिती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हस्तकलाकारांना केंद्र सरकार
पुरस्कृत हस्तकला विभागामार्फत मोफत प्रशिक्षण तसेच रोजगार संधी, विक्री
व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले जाणार णाआहे.
''साथी'' फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून माण व खटाव तालुक्यासह
सातारा जिल्ह्यातील सर्व हस्तकलाकारांना एका छताखाली आणण्यासाठी
विशेष प्रयत्न केले जातील. तसेच या वस्तूंना मार्केट व देशभरातील प्रदर्शनात दालन खुले होणार आहे.
हस्तकला
विभागामार्फत मनोहर सर यांनी हस्तकलाकारांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि योजनांची माहिती दिली. त्यामध्ये हस्तकला विभागामार्फत
ओळखपत्र, नारी शक्ती पुरस्कार, हस्तकला प्रशिक्षण वर्ग, मार्केटिंग, टूल
कीट आणि मुद्रा लोनबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मनोहर मण्यार, चंद्रकांत
कुंभार, दादा कोकाटे, केतकी कोकाटे, सविता साळुंखे, तसेच, शेनवडी, चोराडे, वडगाव,
उंचीठाणे, पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : जयरामस्वामींचे वडगाव येथे हस्तकलेसंदर्भात मार्गदर्शन करताना विजय कोकाटे व मान्यवर.