लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST2021-09-25T04:43:08+5:302021-09-25T04:43:08+5:30

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ७८ तर दुसऱ्याची ३१ आहे. तरीही दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ...

Emphasize public awareness to increase vaccination | लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ७८ तर दुसऱ्याची ३१ आहे. तरीही दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे,’ अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली.

जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यातील मजूर सकाळी लवकर कामाला जातात. ते लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या मजुरांसाठी सकाळी ७ वाजता लसीकरण सुरू करावे. तसेच ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सध्या लसीचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होत असून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

यावेळी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी उपयुक्त अशा सूचना केल्या.

\\\\\\\\\\\\\\\\\\\

Web Title: Emphasize public awareness to increase vaccination