क-हाड सुरक्षित, निर्भय बनविण्यावर राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:12 PM2020-01-11T23:12:08+5:302020-01-11T23:15:32+5:30

क-हाडातील गुन्हेगारी कारवाया थोपविण्याबरोबरच शहर निर्भय बनविणाऱ्यावर आमचा भर आहे. महिला सुरक्षिततेलाही आम्ही प्राधान्य देत आहोत. - सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक, क-हाड

 Emphasis on making K-bone safe, fearless | क-हाड सुरक्षित, निर्भय बनविण्यावर राहणार भर

क-हाड सुरक्षित, निर्भय बनविण्यावर राहणार भर

googlenewsNext
ठळक मुद्दे गुन्हेगारी मोडीत काढण्यास ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ -चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

संजय पाटील।

क-हाड : ‘गत काही वर्षांत कºहाडमध्ये संघटित गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक टोळ्यांना आत्तापर्यंत मोक्का लावण्यात आला आहे. अन्यही काही टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई होईल. त्याद्वारे संघटित गुन्हेगारी मोडीत काढू,’ असा विश्वास पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी व्यक्त केला.

प्रश्न : संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन काय असेल?
उत्तर : कºहाडातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक गुन्हेगाराच्या हालचालीवर ‘वॉच’ आहे. धमकावल्याची तक्रार झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जात आहे. गुन्हे शाखा सतर्क असून, संघटित गुन्हेगारीशी निगडीत प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास केला जातोय.

प्रश्न : शस्त्र तस्करीचा तपास मुळापर्यंत का जात नाही?
उत्तर : शस्त्र तस्करीबाबतचा गुन्हा दाखल झाल्यास त्याच्या पुरवठादारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होतात. मात्र, अनेकवेळा तांत्रिक अडचण निर्माण होते. तपासात मर्यादा येतात. गुन्हेगार परप्रांतीय किंवा त्याच्या ओळखीबाबतची ठोस माहिती हाती लागत नाही. तरीही असे गुन्हे गांभीर्याने तपासले जात आहेत.

प्रश्न : आॅनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढलेत. ते रोखण्यासाठी काय करता येईल?
उत्तर : नेट बँकिंग, आॅनलाईन शॉपिंग तसेच मोबाईलवरून होणाºया चौकशीबाबत नागरिकांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे. पैसा आपला स्वत:चा आणि घामाचा आहे. त्यामुळे तो सुरक्षितच राहावा, यासाठी प्रत्येकाने स्वत: जागरूक असावे. फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने माहिती द्यावी.
 

  • युवतींनी सक्षम बनणे गरजेचे

महाविद्यालयीन युवतींना सक्षम बनविण्यासाठी निर्भया पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातायत. छेडछाडीची तक्रार युवतींनी थेट पोलिसांकडे करावी, अशी तक्रार झाल्यास छेडछाड करणाऱ्यांना सोडणार नाही. महाविद्यालय तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचे गस्त पथक कार्यरत आहे.
वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणार

क-हाडातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू असून, त्यासाठी काही उपाययोजना पालिकेला कराव्या लागणार आहेत. त्याबाबत पालिका प्रशासनाशी सकारात्मक चर्चाही झाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून वाहतुकीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title:  Emphasis on making K-bone safe, fearless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.