शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शिस्तबद्ध, सुरक्षित वाहतुकीवर राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:27 IST

वाढते अपघात हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात. - अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग

ठळक मुद्दे ‘ब्लॅक स्पॉट’वर उपाययोजना आवश्यक

संजय पाटील।क-हाड : दंडात्मक कारवाई हा वाहतुकीला शिस्त लावण्याचा एक भाग असला तरी फक्त कारवाई करून संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळता येतील. शिस्तबद्ध, अपघातविरहित आणि सुरक्षित वाहतुकीवर आमचा भर राहील, असे मत महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी व्यक्त केले.

प्रश्न : अपघाती क्षेत्र किती? त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?उत्तर : शेंद्रे ते पेठनाक्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग तसेच कºहाड-सांगली, कºहाड-विटा, कºहाड-कोयनानगर, कºहाड-कोकरूड, कºहाड-तासगाव हे मार्ग आमच्या अखत्यारीत येतात. या हद्दीत २६ ठिकाणे अपघाती आहेत. त्या-त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभागाला सुचविल्या आहेत.

प्रश्न : जोडरस्ते सुरक्षित आहेत का?उत्तर : उपमार्ग ज्याठिकाणी महामार्गाला जोडले जातात त्याठिकाणी महामार्गावर रम्बलर तसेच उपमार्गावर गतिरोधक उभारण्याची सूचना केली आहे. या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. त्याचबरोबर उपमार्गावरील अडथळे हटविण्याबाबत महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे. पूर्वसूचना देणारे फलक, ब्लिंकर्स बसविण्याबाबतही मागणी करण्यात आली आहे.

प्रश्न : सुरक्षित वाहतुकीसाठी कशावर भर राहील?उत्तर : लेनकटिंग, वेगमर्यादा ओलांडणे, विनाहेल्मेट दुचाकी प्रवास, सिटबेल्ट नसणे, धोकादायक माल वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी असते. त्यामुळे अशा चालकांवर कटाक्षाने कारवाई केली जात आहे. तसेच त्यांना समजही दिली जात आहे.

महामार्गावर वाहने अडवत नाहीच!महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे कारवाईसाठी कोणतेही वाहन थांबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत नाही. अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार सुरक्षित ठिकाणी कारवाई केली जाते. ई-चलन पद्धतीने दंड आकारणी केली जात असल्याने वाहने अडविण्याचा प्रश्नच नाही.

कोल्हापूर नाका धोकादायक!कोल्हापूर नाक्यावरील वाढते अपघात पाहता याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. सातारा-कोल्हापूर लेनवरील एक लेन कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या वाहनांसाठी वापरात यावी, अशी आमची सूचना आहे. त्याचबरोबर याठिकाणी उड्डाण पूल झाल्यास अपघात टळतील. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. याबाबत संबंधित विभागाशी आम्ही पत्रव्यवहारही केला आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसhighwayमहामार्ग