नॅनो युरिया तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:53+5:302021-06-01T04:28:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : ‘नॅनो टेक्नोलोजीवर आधारित इफको उद्योग समूहाने निर्मिती केलेल्या नॅनो युरियामुळे शेती उत्पादनात भर ...

Emphasis on agricultural production due to nano urea technology | नॅनो युरिया तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात भर

नॅनो युरिया तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : ‘नॅनो टेक्नोलोजीवर आधारित इफको उद्योग समूहाने निर्मिती केलेल्या नॅनो युरियामुळे शेती उत्पादनात भर पडली असून, भारतीय कृषी उद्योगात इफकोने केलेली नवी कृषी क्रांती गौरवशाली आहे,’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.

इफको उद्योग समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आयोजिन ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या सहकार्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

पाटील म्हणाले, ‘नॅनो तंत्रज्ञानामुळे पोषक तत्त्वांचे पिकांमध्ये शोषण, त्याचा उपयोग व कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे खतांचा अपव्यय कमी होऊन शेती खर्चात बचत होते व उत्पन्नात भरघोस वाढ होते.’

योगेंद्र कुमार म्हणाले, ‘इफकोने आत्तापर्यंत जवळपास ९४ विविध पिकांवर नॅनो तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक केले असून, त्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.’

दरम्यान, भारत सरकारद्वारा इफकोला नॅनो युरिया निर्मितीची स्वीकृती दिली असून त्यामुळे शेती उत्पादनात अधिक भर पडेल, असे मत इफकोचे महाप्रबंधक डॉ. रमेश रालिया यांनी व्यक्त केले.

कोट..

अमेरिका कृषी संशोधन संस्थेच्या निष्कर्षानुसार युरियाच्या वापरामध्ये त्याचा केवळ ६० टक्के भाग पिकांद्वारे शोषला जातो. बाकी ४० टक्केपैकी त्यातील १८ टक्के भाग‌ ग्रीन हाऊस वायूत परावर्तीत होतो. याउलट नॅनो युरिया तंत्रज्ञानामुळे ५० टक्के युरियाची बचत होत आहे.

-सुखदेव माने, खरेदी-विक्री संघ कोरेगाव

नॅनो युरिया म्हणजे.....

एखाद्या वस्तूचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढी त्याची कार्यक्षमता जास्त, या भौतिकशास्त्रातील सिद्धांतावर नॅनो युरियाची निर्मिती केली जाते. नॅनो युरियात नत्राच्या कणाचा आकार २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. १ नॅनोमीटर म्हणजे १ मीटरचा १०० कोटींचा भाग असतो. सध्या आपण वापरत असलेल्या बारीक युरियाची तुलना नॅनो युरियासोबत केली असता बारीक युरियाचा एक दाणा हा नॅनो युरियाच्या ५५,००० कणाइतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक युरियापेक्षा १०,००० पटीने जास्त असते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते.

Web Title: Emphasis on agricultural production due to nano urea technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.