शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शिकवणी शुल्कात दीड कोटींचा अपहार, संस्थेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद; साताऱ्यातील प्रकार

By नितीन काळेल | Updated: August 17, 2023 12:46 IST

सातारा : साताऱ्यातील आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्यानेच विद्यार्थ्यांच्या शिकवणीचे शुल्क परस्पर दुसऱ्याच्या नावावर वळते करुन १ कोटी ६८ ...

सातारा : साताऱ्यातील आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्यानेच विद्यार्थ्यांच्या शिकवणीचे शुल्क परस्पर दुसऱ्याच्या नावावर वळते करुन १ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यावर अपहाराचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी नवनाथ बाळासो देशमुख (रा. शिवराज काॅलनी, देगाव फाटा सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गजानन दत्तात्रय गोरे (रा. तळेगाव दाभाडे पुणे) याच्याविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. पोलिसांनी सांगितले की, सातारा शहराजवळ तक्रारदार नवनाथ देशमुख यांचे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये पगारावर संशयित गजानन गोरे काम करत होता. या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिकवणी शुल्क घेण्यात येत होते. याचा हिशोब गोरे याला मागण्यात आला. पण, त्याने तक्रादार देशमुख यांना चुकीची उत्तरे दिली. तसेच १ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम त्याने वडील दत्तात्रय गोरे, पत्नी प्रियंका गोरे आणि कार्यालयातील दीपक सूर्यवंशी आणि प्रीती चव्हाण (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्या खात्यावर वळती केली. तसेच बनावट बिलबूक तयार करुन रोख स्वरुपात रक्कम घेऊन त्याचा अपहार करण्यात आला, अशी तक्रार देण्यात आलेली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोरे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस