पासष्ट वर्षांच्या वृध्दाचा अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:08+5:302021-09-17T04:47:08+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील एका गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली ...

पासष्ट वर्षांच्या वृध्दाचा अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार
कुडाळ : जावळी तालुक्यातील एका गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, मेढा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित वृद्धाला अटक केली आहे.
बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला हाताने इशारा करून हिकडं ये, असे म्हणाल्याने पीडित मुलगी आरोपीकडे गेली. आरोपी बबन सपकाळ याने पीडित मुलीला चल, असे म्हणाला असता पीडित मुलगीने नकार दिला. तेव्हा आरोपीने मुलीच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात तिला नेले. त्यावेळी पीडित मुलीची मैत्रिण तेथून पळून गेली. तेव्हा आरोपी बबनने पीडित मुलीस छपरात नेऊन तिथं तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी जोरजोरात ओरडल्याने आरोपी बबन तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे जावळी तालुक्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित वृद्धावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
दरम्यान, जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे अधिक तपास करीत आहेत.