लोणंद शहरात अकरा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:58+5:302021-04-05T04:34:58+5:30
लोणंद : लोणंद शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या परिसराला प्रतिबंधित ...

लोणंद शहरात अकरा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
लोणंद : लोणंद शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातील चारही बाजूच्या सीमा दि. ४ रोजी बंद करण्यात आल्या आहेत.
लोणंदमध्ये अकरा प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली असून, यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा ठोंबरे मळा परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग क्रमांक ९ जैन मंदिरासमोरील परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग क्रमांक आठ प्यासा हॉटेलसमोरील परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग क्रमांक दहा लक्ष्मी मंदिर परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग १७ जांभळीचा मळा परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग १३ वेताळपेठ परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग १४ ज्योतिबानगर परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभात सतरा खोतमळा परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग १३ बाजार तळ परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग क्रमांक १२ ठोंबरे बिल्डिंग परिघातील संपूर्ण क्षेत्र, प्रभाग क्रमांक १२ इनामदार प्राइड परिघातील संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कोट..
या भागातील सर्व सीमा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये.
-संगीता राजापूरकर-चौगुले, प्रातांधिकारी
०४लोणंद
लोणंद शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.