शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

सहकारी संस्थांच्या निवडणुका 'कमळ' चिन्हावर लढणार नाही, भाजप नेते अतुल भोसलेंनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:28 AM

सहकारी संस्थांचा विषय वेगळा असतो त्यामुळे कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्हा बँकेप्रमाणे आघाडी करूनच लढणार

कऱ्हाड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात अशा भाजपच्या सूचना आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका या भाजप कमळाच्या चिन्हावरच लढेल. पण, सहकारी संस्थांचा विषय वेगळा असतो त्यामुळे कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्हा बँकेप्रमाणे आघाडी करूनच लढणार असल्याचे मत भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.डॉ. भोसले म्हणाले, ‘कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत सर्व उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे करणार आहोत. यात चांगले यश मिळेलच, पण आघाडी करण्याची वेळ आली तर ती निकालानंतर कोणाशी करायची हे ठरवावे लागेल. त्याबाबत आता सांगता येत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आम्ही पक्षाच्या माध्यमातूनच लढणार आहोत. या निवडणुकीची तयारी आमची कायमच सुरू असते.’फडणवीस यांना विचारूनच निर्णयजिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारूनच घेतला होता. त्यांच्यासमोर दोन्ही बाजू मांडल्या होत्या व त्यांच्याशी विचारविनिमय करूनच तो पाठिंबा दिला होता, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

कराड नगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. तसे घडल्यास कराड पालिकेची निवडणूक लढताना त्यांना बरोबर घेणार काय? याबाबत छेडले असता पक्ष ज्या सूचना करील त्यानुसार त्या-त्या वेळचे निर्णय होतील, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूकKaradकराडAtul Bhosaleअतुल भोसलेBJPभाजपा