पुसेसावळीच्या सरपंचपदी दत्तात्रय रुद्रुके यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST2021-03-04T05:13:06+5:302021-03-04T05:13:06+5:30

पुसेसावळी : पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय रुद्रुुके यांची, तर उपसरपंचपदी डॉ. विजय उर्फ राजू कदम यांची बिनविरोध निवड करण्यात ...

Election of Dattatraya Rudruke as Sarpanch of Pusesavali | पुसेसावळीच्या सरपंचपदी दत्तात्रय रुद्रुके यांची निवड

पुसेसावळीच्या सरपंचपदी दत्तात्रय रुद्रुके यांची निवड

पुसेसावळी : पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय रुद्रुुके यांची, तर उपसरपंचपदी डॉ. विजय उर्फ राजू कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय रुद्रुुके, अशोक कदम, मधुरा देशमाने, प्रियांका कदम, महादेव थोरात, जमाल नदाफ, डॉ.विजय उर्फ राजु कदम, सुजाता माने, सुरेखा माळवे, संग्राम कदम, शांताबाई कदम, गौरी कुंभार, संजय त्रिंबके, दीप्ती कदम, सुनंदा माळी यांची बैठक झाली.

या बैठकीत दत्तात्रय रुद्रुके यांची सरपंचपदी, तर डॉ. विजय उर्फ राजू कदम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, सभापती जयश्री कदम, भाजी मार्केट कमिटी सभापती सी. एम. पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, माजी सरपंच सुरेश कदम, सचिन कदम, सतीश जाधव, चेअरमन संतोष कदम, किरण कदम, महेश पाटील, माजी चेअरमन दत्तात्रय कदम, रवी कदम, सूर्यकांत कदम आदी ग्रामस्थांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

फोटो : ०२ पुसेसावळी

पुसेसावळी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच दत्तात्र रुद्रुके व उपसरपंच विजय कदम यांच्या निवडीनंतर सदस्य व समर्थकांनी जल्लोष केला. (छाया : राजीव पिसाळ)

Web Title: Election of Dattatraya Rudruke as Sarpanch of Pusesavali