निवडणुकीची उत्सुकता; पॅनेल निर्मितीची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:17+5:302021-06-04T04:30:17+5:30
ओगलेवाडी : कृष्णा सहकारी कारखाना निवडणूक लागली आहे. ओगलेवाडी परिसरात असणाऱ्या सभासदांच्यात कोण जिंकणार ...

निवडणुकीची उत्सुकता; पॅनेल निर्मितीची प्रतीक्षा !
ओगलेवाडी :
कृष्णा सहकारी कारखाना निवडणूक लागली आहे. ओगलेवाडी परिसरात असणाऱ्या सभासदांच्यात कोण जिंकणार याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याची निवडणूक नेहमीच रंगतदार होत असते. सध्या या कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. वेगवेगळ्या पॅनेलमध्ये असलेले कार्यकर्ते आपलेच पॅनेल कसे जिंकणार याची चर्चा करू लागले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून ओळख असलेला कृष्णा कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. ओगलेवाडी व परिसरात या कारखान्याची सभासदसंख्या मोठी आहे. विविध गटांत विभागलेले हे सभासद आता निवडणूक वातावरणात वावरत आहेत. मात्र अजून पॅनल किती पडणार व कोणाकोणाची आघाडी होणार याबाबत मतमतांतरे ऐकायला मिळत आहेत. तीन पॅनेल होणार की दोन होणार याची खुमासदार चर्चा रंगत आहे. तसेच आपल्या भागातील उमेदवारी कोणाला याचीही चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या पॅनलचे उमेदवारी कोणाला तसेच दोन पॅनल राहिले तर उमेदवारी कोणाला याचीही चर्चा सुरू झाली आहे.
एकूणच कृष्णाच्या निवडणुकीत रंगत यायला लागली आहे. जसजशी उमेदवारी आणि पॅनेल संख्या स्पष्ट होईल तशी ही रंगत वाढत जाईल. पॅनेल निर्माण झाले की सभासद कार्यकर्ते कामाला लागतील असेच सध्या चित्र आहे.