शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: ग्लासमध्ये दारू कमी भरली म्हणून वृद्धाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:09 IST

सातारा : चाहूर, सातारा येथे राष्ट्रीय महामार्गालगत भंगार दुकानात रात्री ग्लासमध्ये दारू भरल्याच्या कारणावरून शुक्रवारी पहाटे दोन कामगारांमध्ये तुंबळ ...

सातारा : चाहूर, सातारा येथे राष्ट्रीय महामार्गालगत भंगार दुकानात रात्री ग्लासमध्ये दारू भरल्याच्या कारणावरून शुक्रवारी पहाटे दोन कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात सिमेंटची वीट मारल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा कामगार जखमी झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल झाला आहे.जगन्नाथ दगडू पवार (वय ६०, रा. केसरकर पेठ) असे मृत कामगाराचे नाव आहे तर दुसरा कामगार तुकाराम जगन्नाथ पवार (रा. बामणेवाडी, जि. धाराशिव) हा जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुकान मालक प्रशांत नानाजी कांबळे (रा. शाहुपूरी) यांच्या फिर्यादीनुसार तुकाराम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जगन्नाथ पवार सहा वर्षापासून महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानात कामाला होता. दि. २ जुलैला तुकाराम दुकानात काम मागण्यासाठी आला होता. त्यालाही कांबळे यांनी कामावर ठेवले होते. ते दोघे दुकानावरील शेडमध्येच रात्री राहत होते. गुरुवारी रात्री दारू कमी दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये मारामारी झाली. त्यावेळी तुकाराम याने दगडू याला चुलीच्या सिमेंटच्या विटेने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.पहाटे साडेतीनच्या तुकाराम शेजारी असलेल्या दुकानात गेला. तेथील कामगाराला उठवून मालकाला फोन करायला लावला. फोनवरून त्याने प्रशांत कांबळे यांना मारामारीची माहिती दिली. त्यानंतर प्रशांत वडिलांसह दुकानावर गेला. तेव्हा तेथे जगन्नाथ पवार रक्ताच्या थारोळ्यात दिसले. तसेच तुकाराम हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली.याबाबत त्यांनी डायल ११२ ला फोन करून शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी गेले. त्यावेळी जगन्नाथ हा निपचीत पडलेला पोलिसांना दिसला. त्याच्या तोंडावर व डोक्याला गंभीर मारहाण होवून जागीच मृत्यू झालेला होता. घटनास्थळावरील पंचनामा व इतर प्रक्रीया झाल्यानंतर आज सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. जखमी तुकारामवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर प्रशांत यांनी तुकाराम विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.